top of page

जीवन प्रवास

जीवन प्रवास म्हणजे आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा विविध अनुभवांचा आणि शिकवणींचा प्रवास. बालपण, किशोरवय, तरुणपण, प्रौढपण आणि वृद्धापकाळ अशा विविध टप्प्यांतून आपण प्रवास करतो. प्रत्येक टप्प्यात नवी शिकवण, आनंद, संघर्ष आणि आत्मसंतोषाचा अनुभव येतो. जीवन प्रवास हा एक अद्वितीय आणि सखोल अनुभव आहे, जो आपल्याला समृद्ध करतो.

About

श्री दीपक दादा.

WhatsApp Image 2024-07-06 at 6.05.42 PM.jpeg

दीपक जनार्दन खडके, वय ६२, जन्म नागपूर, शिक्षण पदवी पर्यंत. वयाच्या १७ व्या वर्षांपासून जीवन प्रवासाला सुरुवात. अनेकविध नोकऱ्या व व्यवसाय करताना समोर येणाऱ्या प्रत्येकाचे विविध अंगाने अवलोकन व आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध व त्यामागे नियतीचे प्रयोजन व त्यात डोकावण्याचा स्वभाव.मी घडत असतांना नियतीने जशी चांगल्या लोकांची व्यवस्था माझ्या आजूबाजूला केली होती, तसेच वाईट प्रवृत्तीच्या लोकांचाही माझ्या आयुष्यात सतत वावर होता. तेव्हा तुकाराम महाराजांची ओवी ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ आठवत असे. कदाचित याच लोकांमुळे मी हि अध्यात्मिक उंची गाठू शकलो. यामुळे आयुष्याला मिळालेली कलाटणी यात नियती व ईश्वरी संकेतांची सतत होणारा मानसिक संघर्ष. यातूनच आयुष्यात गुरुचे आगमन व त्यांच्या चरणी समर्पण, त्यामुळे ‘आत्मा- मन व मेंदू’ यांच्यात चालणार सततचा संघर्ष व मी कोण व का? ह्या प्रश्नांची मिळालेली उत्तरे, त्यातून ‘ईश्वर, गुरु आणि शिष्य’ या त्रयींच्या अस्तित्वाबद्दलची उत्कंठा. अध्यात्मिक उंची गाठलेल्या अनेक जाती, धर्माचे, योगी, संत-महात्मे अवलिया यांचेशी आलेला संपर्क व त्यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने गेल्या २४ वर्षात व्यवहारिक व आध्यत्मिक अनुभूतीतून आलेली प्रचिती व त्यातूनच ‘गुरु शोधावा का?’ चे प्रयोजन .

bottom of page